Viral Video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. मात्र, एक तरुण आपली बाईक घेऊन रेल्वेच्या डब्यात घुसला आहे. सीटच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत हा तरुण आपली बाईक चालवत आहे. या तरुणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण चक्क बाईक घेऊन रेल्वेच्या डब्यात आला आहे.
या व्हिडिओत एक तरुण लोकल ट्रेनमध्ये बाईक चालवत असल्याचे दिसत आहे. ट्रेनमध्ये प्रवासी सीटवर बसलेले आहेत. तर, हा तरुण टच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेतून बाईक चालवत पुढे नेत आहे. या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर या व्हिडिओवर भन्नाट कमेंट देखील येत आहेत. लोकल ट्रेनमध्ये बाईक चालवणाऱ्या या तरुणाला अनेकांनी मूर्खात काढले आहे. ट्रेनमध्ये बाईक नेली कशी असा प्रश्न काहीजण विचारत आहेत. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाने स्टंट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते
पाहा व्हिडीओ
हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @kalyugpur नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “अशा लोकांना फक्त पोलीस लाठीमारच सुधारू शकतात.”