Viral Video: आजच्या डिजिटल युगात डान्स आणि सोशल मीडिया हे अनेकांसाठी केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिलेले नाही, तर उत्पन्नाचे साधनही बनले आहे. अनेक डान्सर्स इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नृत्याचे व्हिडीओ शेअर करून मोठा प्रेक्षकवर्ग तयार करत आहेत. लोकप्रियता वाढल्यानंतर त्यांना ब्रँड प्रमोशन, जाहिराती, सशुल्क सहकार्य , लाईव्ह परफॉर्मन्स आणि प्लॅटफॉर्मच्या कमाईच्या विविध सुविधांमधून उत्पन्न मिळते.

सोशल मीडियावर अनेक कलाकार वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित डान्स व्हिडीओ सादर करताना दिसतात. त्यापैकी काही पुरुष कलाकार मनोरंजन, अभिनय किंवा विनोदी सादरीकरणाचा भाग म्हणून स्त्री वेश परिधान करून नृत्य करतात. त्यांच्या हावभाव, अभिनयकौशल्य आणि नृत्यशैलीमुळे असे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. काही कलाकार पारंपरिक लोककला किंवा रंगभूमीतील भूमिकांनुसारही स्त्री पात्रांची वेशभूषा करतात. अशा सादरीकरणांचा उद्देश प्रामुख्याने मनोरंजन, कलात्मक अभिव्यक्ती किंवा सांस्कृतिक सादरीकरण असतो आणि प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो.

लावणी नृत्य ही महाराष्ट्राची लोककला आहे. गावाच्या जत्रेतून पिढ्यापिढ्या मनोरंजन करणारी लावणी आजही लोकांच्या पंसतीस उतरते. लावणी ही वाटते तितके सोपे नाही. लावणी करण्यासाठी नृत्याची जाण तर लागतेच त्याचबरोबर नृत्य करण्यासाठी अदाही लागते. ढोलकीच्या तालावर आणि घुंगराच्या बोलावर एकापेक्षा एक लावणी सादर करणाऱ्या कलाकारांचे अनेक व्हिडिओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण मोजकेच व्हिडिओ असतात जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आताही असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिवाळी सेलिब्रेशनदरम्यानचा आणखी एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण ‘वाजले की बारा’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर उत्साहात डान्स करताना दिसत आहे. गाण्याचा ठेका पकडत तो भन्नाट डान्स स्टेप्स करत असून, त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. ऑफिसमधील इतर कर्मचारीही त्याच्या डान्सचा आनंद घेताना दिसत आहेत. कामाच्या व्यापातून वेळ काढून आपल्या कलागुणांना वाव देणाऱ्या या तरुणाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by कळेकर बाजी (@princebaji12)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @princebaji12 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “क्या बात है भावा” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर केलास मित्रा.” आणखी एका युजरने लिहिलेय, “दादा काय सुंदर नाचलास”