Viral Video: सोशल मीडियावर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच काही तरूणींचा डान्स व्हायरल होत आहे.
रेल्वे म्हणजे अनेक भारतीयांचा जीव की प्राण. दर दिवशी हजारो लोकं रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. या रेल्वेमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा रेल्वेमधील व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. पण आता समोर आलेला व्हिडीओ रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरील एस्कलेटरवर भरतनाट्यम करताना दिसत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवून प्रसिद्ध होण्यासाठी हल्ली अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. त्यासाठी अनेकजण अश्लील पद्धतीचे नृत्य करतात. परंतु आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुणी भरतनाट्यम करताना दिसत आहेत. त्यांचे हे नृत्य पाहू लोक त्यांच्याकडे कौतुकाने पाहताना दिसत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका तरूणी साडी नेसून एस्कलेटरवर सुंदर हावभाव अन् भरतनाट्यममधील सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यांचे हे सुंदर नृत्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओ इन्स्टग्रामवरील @teamanartana अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत व अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर नाचलात” तर एका युजरने लिहिलेय, “इंडियन ब्युटी” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारतीय नारी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात खरा कलाकार”
