Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘धुरंधर’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. या चित्रपटातील ‘FA9LA’ हे गाणं आणि या गाण्यातील अक्षय्य खन्नाच्या डान्सने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या याच गाण्यावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय.
मासिक पाळी प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अगदी नाजूक क्षण असतो. पौगंडावस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात. त्याच सुमारास मुलींना मासिक पाळी (Menstruation) यायला सुरुवात होते. वयात आल्यावर योनीमार्गे दर महिन्याला रक्तस्राव होण्याच्या प्रक्रियेला मासिक पाळी, असे म्हटले जाते. या कालावधीत प्रचंड चिडचिड, थकवा, अंग दुखणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे पूर्वीच्या काळी स्त्रियांना चार दिवस सगळ्या कामांपासून आराम दिला जायचा. पण, जसजसा काळ बदलत चालला आहे, तसतसं जुन्या परंपरांना पूर्णविराम द्यायला सुरुवात झाली आहे.
जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तिच्यासाठी तो क्षण खूप वेगळा असतो. हा क्षण आयुष्याभर लक्षात राहावा यासाठी दक्षिण भारतातील लोक मोठ्या समांरभाचे आयोजन करतात. सध्या अशाच एका फंक्शनमधील व्हिडीओ समोर आलाय, ज्यात ती मुलगी सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिने ‘धुरंदर’ या या चित्रपटातील ‘FA9LA’ या गाण्यावर डान्स केला. तिच्या हटके डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून समोर जमलेले सर्व लोक मोठमोठ्याने ओरडून तिला प्रोत्साहन देतात. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bindu_glam_artistry या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत अनेक २० मिलियन व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप छान’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘मस्तच’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूप खतरनाक’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘लयभारी नाचलीस.’
