Viral Video: सोशल मीडियावर सध्या विविध प्रकारचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तरुण-तरुणींपासून गृहिणींपर्यंत अनेकजण लोकप्रिय गाण्यांवर वेगवेगळ्या अंदाजात डान्स करताना दिसतात. काही व्हिडीओ भन्नाट स्टेप्समुळे, तर काही हटके लोकेशन आणि अनोख्या सादरीकरणामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे सोशल मीडिया हे अनेकांसाठी डान्सची कला दाखवण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

लावणी ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेची ओळख असलेली पारंपरिक नृत्यशैली आहे. ढोलकीच्या ठेक्यावर सादर होणाऱ्या लावणीमध्ये नृत्य, अभिनय, हावभाव आणि ताल यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. आकर्षक पदन्यास आणि प्रभावी सादरीकरणामुळे लावणीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत विशेष स्थान मिळाले आहे. आजही अनेक कलाकार विविध मंचांवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लावणी नृत्यकला जपताना आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.

‘३६ नखरे वाली’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. या गाण्यावर अनेकजण वेगवेगळ्या अंदाजात डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. हटके डान्स स्टेप्स आणि आकर्षक सादरीकरणामुळे या गाण्यावरील व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ‘३६ नखरे वाली’ गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

या गाण्यावर सध्या एका तरुणीने केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी पारंपरिक पोशाख परिधान करून ‘३६ नखरे वाली’ गाण्यावर सुंदर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिच्या पारंपरिक लूकसोबत डान्सच्या आकर्षक स्टेप्समुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anushka_bhandare10 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर लावणी केलीस डान्स पोरी” एका युजरने लिहिलेय, “लावणी केलीस गं” आणखी एका युजरने लिहिलेय, “अस्सल लावणी”