Viral Video: लोकगीतांतील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कोळीगीते’. त्यात मुंबई आणि कोळीगीते हे समीकरण अगदी अनोखेच आहे. वाढदिवस, वरात, लग्न असो किंवा अगदी गणपती मिरवणूक असो कोळीगीत लावल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होत नाही. कारण या गाण्यांवर नाचण्याची मजा काही वेगळीच असते. ‘एकवीरा आई गो एकवीरा आई’, ‘हिंगालय देवी’, ‘वेसावची पारू’ ‘रसिकाच्या लग्नात’ या गाण्यांनी तर अक्षरशः लोकांच्या मनात घरच केलं आहे. तर असंच मनात घर करणारं एक नवीन कोळी गीत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच ‘तो तो विमान’ हे गाणंदेखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, आता नुकतीच होळी पौर्णिमा पार पाडली यानिमित्ताने “सण शिंमग्याचा आला हो शिंमग्याचा आला” हे जुने कोळी गीत पुन्हा चर्चेत आलं आहे, ज्यात एक महिला अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय.
समाजमाध्यमांवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतात. हल्ली सोशल मीडियावर कोळी गीतदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत. सध्या अशाच एका कोळीगातावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय. यामध्ये एक तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर अनेक नवनवीन मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही. सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड होत असतात. त्यात मराठमोळी गाणी तर भलतीच चर्चेत असतात. ही गाणी असतातही तशीच मजेदार. गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, बाया भुकेल्यान गं, बाया बांगुऱ्या मांगतान गं, नटीनं मारली मिठी अशी गाणी व्हायरल होत आहेत. या गाण्यांवर अनेकांनी डान्स करत आपली कला सादर केली आहे. ही गाणी ट्रेंडमध्ये असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी समुद्र किनारी सुंदर पारंपारिक वेश करून ‘सण शिंमग्याचा आला हो शिंमग्याचा आला’ या कोळी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @niyati.pagdhare या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केला हिने”
