Viral Video: समाजमाध्यमांवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतात. हल्ली सोशल मीडियावर कोळी गीतदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत. सध्या अशाच एका तरूणीचा एक डान्स व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. यामध्ये एक तरूणी सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर अनेक नवनवीन गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही. सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड होत असतात. त्यात तमिळ गाणी तर भलतीच चर्चेत असतात. सध्या असंच एक गाणं प्रचंड चर्चेत आहे ज्यावर अनेक युजर्स डान्स करताना दिसत आहेत.

दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता अशाच एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी समुद्र किनारी साडी नेसून ‘आसा कोडू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. तरूणीच्या या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्ही देखील तिचं कौतुक कराल. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Battula Bhavana ? (@its.bhavs10)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @its.bhavs10 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “ताई खूपच भारी नाचलात” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “एक नंबर केला हिने”