Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरूणी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.
अनेकांना त्यांच्या लहानपणापासूनच नृत्याची आवड असते. त्यामुळे ते लहानपणापासूनच त्या क्षेत्रात जाण्यासाठी मेहनत घेतात. सोशल मीडियावरही अशा हौशी कलाकरांचे सुंदर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात कधी कोणी लावणी करताना दिसतं, तर कधी कोणी विविध सुंदर डान्स करताना दिसतात.
हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका डान्स क्लासमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका डान्स क्लासमध्ये काही तरुणी उभ्या असून त्यातील एकजण ‘बडी मुश्किल’ या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या डान्सला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @supriyachavanofficial या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “माधुरी आणि मनीषापेक्षा भारी डान्स केलास” एका युजरने लिहिलेय, “पोरी तुझा नाद खुळा” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई काय सुंदर नाचलीस”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “याला बोलतात डान्स”
