Viral Video: आजच्या काळात अनेक तरुणींमध्ये नृत्याविषयी मोठी आवड निर्माण झाल्याचे दिसून येते. पारंपरिक, कथ्थक, भरतनाट्यम, फोक डान्सपासून ते बॉलिवूड, फ्युजन आणि फ्रीस्टाईल अशा विविध नृत्यप्रकारांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत आहेत. सोशल मीडियामुळे आपल्या नृत्यकलेला मोठे व्यासपीठ मिळाल्याने अनेक तरुणी रील्स आणि व्हिडीओच्या माध्यमातून आपली कला जगासमोर सादर करत आहेत.

डान्स हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून संपूर्ण शरीराचा प्रभावी व्यायामही मानला जातो. नृत्य करताना हात, पाय, कंबर आणि शरीरातील अनेक स्नायू सक्रियपणे काम करतात, त्यामुळे शरीराची लवचिकता, संतुलन आणि स्टॅमिना सुधारण्यास मदत होते. नियमित डान्स केल्याने कॅलरी बर्न होण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास हातभार लागू शकतो. याशिवाय नृत्यामुळे तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते. त्यामुळे अनेक जण फिटनेससाठी जिमसोबत किंवा त्याऐवजी डान्सचाही पर्याय निवडत आहेत.

पावसाळा सुरू होताच सोशल मीडियावर पावसातील डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. रिमझिम सरींमध्ये बॉलिवूड गाण्यांवर, मराठी लावणीवर किंवा ट्रेंडिंग गाण्यांवर अनेक तरुण-तरुणी उत्साहाने नृत्य सादर करताना दिसतात. निसर्गरम्य वातावरण, पावसाचे थेंब आणि मनमोकळा डान्स यामुळे हे व्हिडीओ प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतात. अनेक कंटेंट क्रिएटर्स पावसाच्या वातावरणाचा वापर करून आकर्षक रील्स तयार करतात, ज्यांना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज आणि भरभरून प्रतिसाद मिळतो.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा भरपावसातील डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. रिमझिम पावसात ती ‘भीगी हुई बरसात मगर’ या गाण्यावर अतिशय सुंदर भावमुद्रा आणि मनमोहक स्टेप्स सादर करताना दिसते. पावसाचे थेंब, हिरवेगार वातावरण आणि गाण्याशी सुसंगत तिचा नृत्याविष्कार यामुळे हा व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by __sku__ (@__sku___)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sku_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “लयभारी ताई” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई काय सुंदर नाचलीस”