Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या दोन तरुणींचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी ‘बिडी जलाई लै’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या या डान्सला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ युट्यूबवरील @akshitagoeldance या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत सात मिलियन व्ह्युज मिळाल्या असून, लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “खतरनाक नाचला राव”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “सुंदर, अतिसुंदर नाचली ही”, तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी पोरींनो.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “राडाच केला यांनी”, तर एकाने लिहिलंय की, “यांचा डान्स पाहून अंगावर काटा आला”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “:आईशप्पथ खूपच खतरनाक”