Viral Video: समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतो. हल्ली सोशल मीडियावर जुनी मराठी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुलिवंदन पार पडलं. धुलिवंदनानिमित्त अनेकांचे मित्रपरिवारासोबत रंग खेळतानाचे, गाणी म्हणतानाचे आणि ठेका धरून नाचतानाचे असंख्य व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून आहे. ज्याच एक तरूणी होळी खेळता खेळता डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर बेभान होऊन डान्स करताना दिसतेय, यावेळी ती करत असलेल्या हटके डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
A post shared by ASCHARYA ಡ್ರಾಮಾ DKD (@ascharya_drama_dkd_official)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ascharya_drama_dkd_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “खूप सुंदर नाचलीस.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “राडाच केला राव”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “याला बोलतात अस्सल डान्स.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खरंच खूप भारी नाचली ही”
