Viral Video: सोशल मीडियामुळे अनेक नवोदित कलाकारांना आपली कला जगासमोर सादर करण्याचे मोठे व्यासपीठ मिळाले आहे. पूर्वी प्रसिद्धीसाठी मोठ्या मंचाची किंवा निर्मात्यांच्या संधीची वाट पाहावी लागत होती; मात्र आता डान्स, गायन, अभिनय किंवा इतर कलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून कलाकार थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतात. एखादा व्हिडीओ व्हायरल झाल्यास अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळू शकते. त्यामुळे अनेक कलाकारांसाठी सोशल मीडिया आपली ओळख निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग ठरत आहे.
सोशल मीडियावर सध्या बॉलिवूडच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. तरुण-तरुणींपासून विविध वयोगटातील लोक आपल्या आवडत्या गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. हटके स्टेप्स, आकर्षक हावभाव आणि भन्नाट डान्समुळे अनेक व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळत असून, काही व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल होत आहेत.
‘चिकनी चमेली’ हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गाणं आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. गाण्याची दमदार चाल, उत्साही संगीत आणि आकर्षक डान्समुळे त्याची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियावरही अनेक जण या गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात.
सोशल मीडियावर सध्या ‘चिकनी चमेली’ या लोकप्रिय गाण्यावरील डान्स व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आणि एक तरुणी या गाण्याच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. दोघांच्या एनर्जेटिक स्टेप्स आणि आकर्षक अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, त्यांच्या डान्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ @supriyaaa_dance या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज अन् अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “दोघेही खूप भारी नाचले” एका युजरने लिहिलेय, “याला बोलतात खरा डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखुळा डान्स राव”
