Viral Video: हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका डान्स क्लासमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या बेटा चित्रपटातील ‘धक धक करने लगा’ या गाण्याने अक्षरशः अनेकांना भुरळ पाडली. या गाण्यावर आजही अनेक तरुणी ठेका धरताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका डान्स क्लासमध्ये एका तरुणीच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ही तरूणी ‘धक धक करने लगा’ या जुन्या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या सुंदर डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभावही लक्ष वेधून घेत आहेत. सोशल मीडियावर तिच्या या डान्सला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Roshni Tailor (@swadharma_)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @swadharma_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “माधुरीच आहेस जणू” एका युजरने लिहिलेय, “या पोरीचा डान्स बघून भारी वाटलं.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईशप्पथ, लय भारी नाचली ही”