Viral Video: सोशल मीडियावर सध्या तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. विविध गाण्यांवर आकर्षक डान्स स्टेप्स करत तरुणी आपले व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. एखादा डान्स व्हिडीओ प्रेक्षकांना आवडला की त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळतात. त्यामुळे अनेक तरुणी आपल्या डान्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी विविध ठिकाणी डान्सचे व्हिडीओ शूट करताना दिसतात. घर, रस्ते, पर्यटनस्थळे, गार्डन किंवा गर्दीची ठिकाणे अशा वेगवेगळ्या लोकेशनवर डान्स करून हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. हटके लोकेशन, ट्रेंडिंग गाणे आणि आकर्षक डान्स स्टेप्स यामुळे अनेक व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावर व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेही डान्स करण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच वाढताना दिसत आहे.

डान्स हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून एक उत्तम व्यायामही मानला जातो. डान्स करताना शरीराच्या अनेक स्नायूंची हालचाल होत असल्याने कॅलरी बर्न होण्यास आणि शरीर सक्रिय राहण्यास मदत होते. नियमित डान्स केल्याने हृदयाचे आरोग्य, शरीराची लवचिकता, संतुलन आणि स्टॅमिना सुधारण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर आवडत्या गाण्यावर डान्स केल्याने मूडही चांगला राहतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रोजच्या व्यायामात कंटाळा येत असेल तर आवडीच्या गाण्यांवर डान्स हा आनंददायी पर्याय ठरू शकतो.

सोशल मीडियावर सध्या जुन्या हिंदी गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये एक तरुणी ‘घूंघट के आड़ से’ या लोकप्रिय गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. पारंपरिक अंदाजातील पोशाख आणि गाण्याच्या तालावर केलेल्या आकर्षक डान्स स्टेप्समुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या डान्सला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकजण व्हिडीओवर कमेंट्स आणि प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Sujata_rajpurohit14 (@suraj_rajpurohit14)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suraj_rajpurohit14 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर डान्स केला पोरी” एका युजरने लिहिलेय, “लयभारी नाचलीस गं.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई लय सुंदर नाचलीस”