Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवितात. मागील काही वर्षांपासून सोशल मीडिया असो किंवा कॉलेज, शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न समारंभ सगळीकडेच‘गुलाबी साडी’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एका तरूणीने जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
ऑफिस म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख, तणाव पाहायला मिळतो. परंतु हल्ली अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी दररोज काही वेळ किंवा आठवड्यातील एखाद्या वाराला मनोरंजन करण्यासाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यात खेळ खेळले जातात, गाणी म्हटली जातात किंवा डान्स केला जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ऑफिसमध्ये तीन तरूणी गुलाबी साडी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी या तिघींपैकी एका तरूणीच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती या गाण्याच्या तालावर अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय. शिवाय या गाण्यावरील तिचे हावभावही लक्षवेधी आहेत. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @asiyabegum_या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून याव्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “क्या बात है सुंदरी”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पोरी कमाल केलीस”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “किती सुंदर नाचलीस गं”
