Viral Video: भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध देश आहे. त्यामुळे येथे हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, मल्याळम, कन्नड, बंगाली अशा अनेक भाषांतील गाणी लोकप्रिय ठरतात. सोशल मीडिया आणि म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममुळे एका भाषेतील गाणे देशभरातील लोकांपर्यंत सहज पोहोचते. आकर्षक संगीत, दमदार शब्दरचना आणि उत्कृष्ट सादरीकरणामुळे ही गाणी सतत चर्चेत राहतात. अनेकदा प्रादेशिक भाषांतील गाणीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवतात.
मराठी संगीतविश्वात अनेक गाणी त्यांच्या वेगळ्या ठेक्यामुळे आणि आकर्षक शब्दांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. त्यापैकी ‘हिल पोरी हिला’ हे गाणेही विशेष चर्चेत नव्याने आले आहे. जोशपूर्ण संगीत, उत्साहवर्धक ताल आणि नृत्यासाठी योग्य असलेली लय यामुळे हे गाणे तरुणांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. सोशल मीडियावरही या गाण्यावरील डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. सध्या याच गाण्यावर एका तरूणीने ठेका धरला आहे.
नृत्य केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक आहे. नियमित नृत्य केल्याने शरीर लवचिक राहते, तंदुरुस्ती वाढते आणि आत्मविश्वास विकसित होतो. तसेच नृत्यामुळे सर्जनशीलता वाढते आणि तणाव कमी होण्यास मदत होते. आजच्या काळात नृत्यकलेला जागतिक स्तरावर मोठी लोकप्रियता मिळाली असून अनेक तरुण यामध्ये करिअरही घडवत आहेत. त्यामुळे नृत्यकला ही केवळ एक कला नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि सांस्कृतिक जतनाचे एक प्रभावी माध्यम आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी रस्त्यावर ‘हिल पोरी हिला’ या मराठी गाण्यावर डान्स करता आहे. यावेळी ती करत असलेला डान्स आणि चेहऱ्यावरील हावभाव अनेकांचे लक्ष वेधत आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @raginishukla_04 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “जबरदस्त डान्स”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “तू लयभारी”
