Viral Video: पूर्वी लग्नसराई म्हटलं की शुभ मुहूर्त, मानपान, लग्नातील विधी याकडे अधिक लक्ष दिलं जायचं. परंतु, आताच्या लग्नांमध्ये लग्नातील वधू-वराच्या एन्ट्रीचे डान्स, भन्नाट उखाणे, फोटो, व्हिडीओ याकडे अधिक लक्ष दिलं जातं. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी हळदीत भन्नाट नाचली आहे.

सोशल मीडियावर जुनी गाणी, नवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. १९९० मध्ये माधुरी दीक्षितच्या चित्रपटातील ‘हमको आज कल है इंतजार’ हे गाणं आजही प्रत्येक कार्यक्रमात लावले जाते. अनेक तरुणी या गाण्यावर आवर्जून डान्स करतात. सध्या याच गाण्यावरील एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी पिवळ्या-निळ्या रंगाची साडी नेसून हळदी समारंभामध्ये इतर तरुणींबरोबर डान्स करत आहे. यावेळी माधुरी दीक्षितचे प्रचंड लोकप्रिय असलेले ‘हमको आज कल है इंतजार’ गाणं लागताच तिचा चेहरा खुलतो व ती फुल जोशमध्ये या नाचायला सुरूवात करते या गाण्यावरील तिचा हा डान्स पाहून आजूबाजूला उभे असलेले लोक कौतुकाने पाहतात, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by lichu_? (@lichuuu.lichuu)

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lichuuu.lichuu या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत चार मिलियन व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘एक नंबर पोरी…’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘तरुणी खरंच खूप उत्साही आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘व्वा राडाच केला हिने’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘तुला पाहून माधुरी दीक्षितची आठवण आली’