Viral Video: कॉलेजमधील काळ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत अविस्मरणीय काळ असतो. कॉलेजमधील असंख्य आठवणी असतात, ज्या आयुष्यभर आनंद देतात. कॉलेजमधील अभ्यास, मजामस्ती, पिकनिक, फ्रेशर्स पार्टी, वार्षिक समारंभ, विविध प्रकारचे इव्हेंट या सगळ्यांमुळे ते दिवस कसे संपतात तेच कळत नाही. सध्या एका कॉलेजातील समारंभाचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.

समाजमाध्यमांवर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाच्या डान्सने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘जलेबी बाई’ या हिंदी गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत. तिचा हा डान्स पाहून खाली बसलेले प्रेक्षक तिच्याकडे कौतुकाने पाहून तिला दाद देत आहेत. तर काहीजण तिचा व्हिडीओ देखील शूट करत आहेत.

पाहा व्हिडीओ: (Viral Video)

View this post on Instagram

A post shared by Sanjana♥️ (@sanjanaverma6284)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sanjanaverma6284 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या असून, अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “नुसता धुरळा”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “असा डान्स कधीच पाहिला नाही”, तर आणखी एकानं लिहिलंय, “लयभारी ताई”. तर आणखी एकाने लिहिलंय की, “खरंच सुंदर नाचली ही”