Viral Video: सोशल मीडियावर सध्या डान्स व्हिडीओंचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. हटके स्टेप्स, लोकप्रिय गाणी आणि भन्नाट अंदाजातील डान्समुळे काही व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल होत आहेत. नेटकरीही या व्हिडीओंना भरभरून पसंती देत असून, कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करत आहेत. असाच एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हल्ली तरुणींमध्ये डान्सची आवड मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सोशल मीडियामुळे ही आवड व्यक्त करण्यासाठी त्यांना नवे व्यासपीठ मिळाले असून, लोकप्रिय गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ त्या आवडीने शेअर करतात. पारंपरिक गाण्यांपासून ट्रेंडिंग म्युझिकपर्यंत विविध गाण्यांवर तरुणींच्या डान्स व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. विशेष म्हणजे सण-उत्सवांच्या काळात अशा व्हिडीओंची संख्या आणखी वाढते.

डान्स हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून एक उत्तम शारीरिक व्यायामही आहे. डान्स करताना शरीराच्या अनेक स्नायूंची हालचाल होते, त्यामुळे कॅलरी बर्न होण्यास आणि शरीराची सक्रियता वाढण्यास मदत होते. नियमित डान्स केल्याने हृदयाचे आरोग्य, शरीराची लवचिकता, संतुलन आणि स्टॅमिना सुधारण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर डान्समुळे मूड चांगला राहण्यास आणि ताण कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे आवडीच्या गाण्यांवर डान्स करणे हा व्यायामाचा आनंददायी पर्याय ठरू शकतो.

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘कजरा मोहब्बत वाला, अंखियों में ऐसा’ या लोकप्रिय गाण्यावर सुंदर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्समधील आकर्षक स्टेप्स आणि आत्मविश्वासपूर्ण अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असून, व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by _sona_? (@sona__2002___)

हा व्हिडीओ @sona__2002___ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज अन् अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय, “व्वा काय सुंदर नाचलीस” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर गं पोरी ” आणखी एका युजरने लिहिलेय, “नादखुळा डान्स”