Viral Video: सोशल मीडियामुळे आज प्रत्येकाला आपली कला आणि कौशल्य जगासमोर मांडण्याची मोठी संधी मिळाली आहे. विशेषतः डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने अनेक तरुण-तरुणींना अल्पावधीत प्रसिद्धी मिळत आहे. एखाद्या गाण्यावर केलेला सुंदर डान्स, अनोखी स्टाइल किंवा आकर्षक परफॉर्मन्स लोकांना आवडला तर व्हिडीओला हजारो-लाखो व्ह्यूज मिळू शकतात. त्यामुळे अनेकजण केवळ मनोरंजनासाठीच नव्हे, तर आपली ओळख निर्माण करण्यासाठीही डान्सचे व्हिडीओ तयार करताना दिसतात.
हल्ली डान्स हा केवळ मनोरंजनाचा प्रकार राहिलेला नाही, तर अनेकांसाठी तो आनंद व्यक्त करण्याचा आणि स्वतःची कला दाखवण्याचा एक मार्ग बनला आहे. लहान मुलांपासून तरुण-तरुणी आणि ज्येष्ठांपर्यंत अनेकांना वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करायला आवडतो. सोशल मीडियामुळे डान्स व्हिडीओ बनवण्याची आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची क्रेझही वाढली आहे. पार्टी, लग्नसमारंभ किंवा मित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरमध्येही डान्समुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
अनेक तरुणी एकत्र आल्या की गप्पा, मजामस्ती आणि उत्साहाला उधाण येते. याच उत्साहातून अनेकदा डान्स करण्याची कल्पना सुचते. संगीताची ताल धरत तरुणी एकत्रितपणे सुंदर डान्स करताना दिसतात. सोशल मीडियामुळे अशा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, ग्रुप डान्समधून तरुणी आपली कला आणि आत्मविश्वासही व्यक्त करत आहेत. एकत्र डान्स करताना त्यांच्यातील मैत्री, उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो.
सध्या सगळीकडे गौरी-गणपतीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. घराघरांत सजावट, आरास आणि गणपती बाप्पाच्या स्वागताची लगबग पाहायला मिळत आहे. याच दरम्यान गणेशोत्सवाच्या उत्साहाला साजेशी अनेक गाणी सोशल मीडियावर आणि विविध कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळत आहेत. या गाण्यांवर तरुण-तरुणी, लहान मुलं तसेच महिलांकडून सुंदर डान्सचे व्हिडीओही तयार केले जात आहेत. उत्सवाचा आनंद, भक्ती आणि डान्सचा उत्साह यामुळे सोशल मीडियावरही गणेशोत्सवाशी संबंधित व्हिडीओंची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
या व्हिडीओतील तरुणी निसर्गरम्य परिसरात ‘कौलारू माडी गं’ या गाण्यावर पारंपरिक नऊवारी साडी नेसून सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिच्या पारंपरिक वेशभूषेला आणि नृत्याच्या मोहक अदांना निसर्गरम्य वातावरणाची सुंदर साथ मिळाली आहे. तिच्या या खास डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
A post shared by ShrutiPatil_official01 (@shrutipatil_official01)
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shrutipatil_official01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “सहजसुंदर!! कितीही वेळा बघावं असं…..” एका युजरने लिहिलेय, “आता कसं गाण्याला शोभा आली सगळ्या गौराई आल्यात” आणखी एका युजरने लिहिलेय, “सगळ्या ताई काय सुंदर नाचल्या”
