Viral Video: समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर ‘लाल लाल कलरची बांगडी’, हे गाणं खूप चर्चेत आहे. आता या गाण्यावर एक तरुणी खूप छान डान्स करताना दिसत आहेत.
‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’ या गाण्यांमुळे चर्चेत आलेला गायक संजू राठोड सतत त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे पुन्हा पुन्हा चर्चेत येतो. त्याचं नवीन गाणं आलं रे आलं की, सोशल मीडियावर रिल्स बनवणाऱ्यांची रांग लागते. ‘काली बिंदी’ आणि ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यांच्या घवघवशीत यशानंतर संजूचं ‘लाल लाल कलरची बांगडी’हे गाणं चर्चेत आलंय. आता या गाण्याची भुरळ सामान्य जनतेपासून मराठी कलाविश्वते अगदी बॉलीवूडपर्यंत प्रत्येकाला पडली आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल. ज्यात एक तरूणी सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी या ‘लाल लाल कलरची बांगडी’ या गाण्यावर अतिशय सुंदर डान्स करतेय. तिचा डान्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाही तिचं कौतुक कराल. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आलाय. नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nehapatil1507 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “नेहा तू खरंच भारी नाचलीस” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “नादच खुळा हिचा” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “आईशप्पथ! खूप मस्त डान्स” आणखी एकाने लिहिलेय,, “खरंच जबरदस्त डान्स केला हिने”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “किती भारी नाचलीस ताई तू”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “डान्स असावा तर असा”
