Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.

सोशल मीडिया सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरूणी खूप भन्नाट डान्स करताना दिसतेय.

बॉलिवूडमधील जुन्या गाण्यांची भुरळ आजही प्रेक्षकांना आहे. या गाण्यांवर सोशल मीडियावरही लोक विविध रिल्स बनवताना दिसतात. कधी कधी जुनी गाणी पुन्हा नव्या चर्चेत येताना दिसतात. ज्यावर नेटकरी रिल्स बनवतात, डान्स करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणीदेखील अशाच एका जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूणी लता मंगेशकर यांच्या “मैं तेरे इश्क में” या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. यावेळी तरूणीने हुबेहुब खऱ्या गाण्यातील अभिनेत्रीप्रमाणे डान्स करताना दिसतेय, गाण्यातील तिच्या स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर अनेक जण खूप कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ksuskalology या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास सात लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काय खतरनाक नाचली ही.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “याला बोलतात खरा डान्स” तर तिसऱ्याने लिहिलेय, “लता दीदींच्या गाण्याला चार चाँद लावलेस” आणखी अनेक युजर्स त्यांच्या डान्सचे कौतुक करताना दिसत आहेत.