Viral Video: हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच एका तरूणीचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून “मन धावतया तुझ्याच मागं” हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं आयपॉपस्टार या शोमध्ये मराठमोळ्या राधिका भिडेने गायलं होतं. सध्या सोशल मीडियावर अनेकजण हे गाणं गाताना किंवा या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सध्या अशाच एका तरूणीचा व्हिडीओ समोर आलाय ज्यात ती या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरूणीने गुलाबी रंगाची साडी नेसली असून या गाण्याच्या तालावर अतिशय सुंदर डान्स करताना दिसतेय. शिवाय या गाण्यावरील तिचे हावभावही लक्षवेधी आहेत. सध्या तिचा हा डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shraddhakokane2001 या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून याव्हिडीओवर आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “क्या बात है सुंदरी”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “पोरी कमाल केलीस”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “किती सुंदर नाचलीस गं”
