Viral Video: सोशल मीडियावर सध्या तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. विविध गाण्यांवर आकर्षक डान्स स्टेप्स करत तरुणी आपले व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. एखादा डान्स व्हिडीओ प्रेक्षकांना आवडला की त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स, कमेंट्स आणि व्ह्यूज मिळतात. त्यामुळे अनेक तरुणी आपल्या डान्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण-तरुणी विविध ठिकाणी डान्सचे व्हिडीओ शूट करताना दिसतात. घर, रस्ते, पर्यटनस्थळे, गार्डन किंवा गर्दीची ठिकाणे अशा वेगवेगळ्या लोकेशनवर डान्स करून हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. हटके लोकेशन, ट्रेंडिंग गाणे आणि आकर्षक डान्स स्टेप्स यामुळे अनेक व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होतात. त्यामुळे सोशल मीडियावर व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेही डान्स करण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच वाढताना दिसत आहे.
सोशल मीडियावर सध्या साऊथ इंडियन गाण्यांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमधील दमदार संगीत, हटके डान्स स्टेप्स आणि ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांवर नेटकरी मोठ्या प्रमाणात रील्स आणि व्हिडीओ बनवत आहेत. त्यामुळे साऊथची अनेक गाणी सोशल मीडियावर सतत चर्चेत असून, तरुणाईपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या गाण्यांची भुरळ पडली आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणी देखील दक्षिणात्य गाण्यावर नाचताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डान्स व्हिडीओंची नेहमीच चर्चा रंगलेली असते. सध्या एका तरुणीचा असाच व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘पावझा मल्ली’ या लोकप्रिय गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, तिने या डान्ससाठी साऊथ इंडियन लूक केला असून, तिच्या नृत्यासोबतच तिच्या लूकचीही चर्चा होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @supriyachavanofficial
या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “क्या बात है… किती भारी नाचली” एका युजरने लिहिलेय, “लयभारी नाचलीस गं.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई लय सुंदर नाचलीस”
