Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘धुरंधर’ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. या चित्रपटातील ‘शरारत’ हे गाण्याने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या याच गाण्यावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय.
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने सोशल मीडियावरही लग्नातील अनेक हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात लग्नातील संगीत सोहळ्यात तरूणी नाचताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी एका लग्नातील संगीत सोहळ्यामध्ये सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी ती तरूणीने ‘शरारत’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करते. तिच्या हटके डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून समोर जमलेले सर्व लोक मोठमोठ्याने ओरडून तिला प्रोत्साहन देतात. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @anjalli_kande05 या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘अप्रतिम’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘तायडे कमाल केलीस’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘खूप खतरनाक’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘लयभारी नाचलीस.’
