Viral Video: हल्ली सोशल मीडियावर विविध प्रकारचे डान्स व्हिडीओ सतत व्हायरल होताना दिसतात. गाण्यांची लोकप्रियता, भन्नाट डान्स स्टेप्स आणि हटके अंदाजामुळे अनेकांचे व्हिडीओ काही क्षणांतच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. तरुण-तरुणींसोबतच गृहिणी, कपल्स आणि ज्येष्ठ नागरिकही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली डान्सची कला दाखवत आहेत. त्यामुळे सोशल मीडिया हे अनेकांसाठी आपली कला आणि टॅलेंट दाखवण्याचे व्यासपीठ बनले आहे.
आजकालच्या तरुणींमध्ये इतर कलांबरोबरच डान्सकडे विशेष आकर्षण वाढताना दिसत आहे. सोशल मीडिया, रील्स आणि विविध डान्स ट्रेंडमुळे नृत्यकलेला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. आवडत्या गाण्यांवर डान्स करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. त्यामुळे अनेक तरुणी डान्सकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर आपली कला, आत्मविश्वास आणि क्रिएटिव्हिटी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून पाहत आहेत.
‘तेरे प्यार में दिल दीवाना है गाना’ हे गाणं आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्याची धून, शब्द आणि खास अंदाजामुळे अनेक वर्षांनंतरही त्याची क्रेझ कायम आहे. सोशल मीडियावरही या गाण्यावर डान्स, रील्स आणि विविध व्हिडीओ पाहायला मिळतात. जुन्या गाण्यांप्रमाणेच या गाण्याची लोकप्रियता नव्या पिढीतही टिकून असल्याचे दिसते.
दरम्यान, आता ‘तेरे प्यार में दिल दीवाना है गाना’ या लोकप्रिय गाण्यावर सध्या एका तरुणीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. या तरुणीने गाण्याच्या तालावर सुंदर डान्स स्टेप्स करत आपली नृत्यकला सादर केली आहे. तिच्या डान्समधील उत्साह आणि खास अंदाजामुळे हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @susmitapal3836 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखाहून अधिक व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “क्या बात है” एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी डान्स केला पोरीने” आणखी एका युजरने लिहिलेय, “लयभारी नाचलीस गं”
