Viral Video: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम राहिले नसून अनेकांसाठी कमाईचे साधन बनले आहे. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर चांगला कंटेंट तयार करून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक मिळवता येतात. डान्स, मनोरंजन, शिक्षण, स्वयंपाक, प्रवास अशा विविध विषयांवरील व्हिडीओंमधून जाहिराती, ब्रँड प्रमोशन, स्पॉन्सरशिप आणि इतर माध्यमांतून उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी सोशल मीडियाचा उपयोग आपली कला दाखवण्यासोबतच आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठीही करत आहेत.

हल्ली सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. विविध गाण्यांवर तरुण-तरुणी तसेच अनेक हौशी कलाकार आपला डान्स सादर करून हे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही व्हिडीओंमध्ये भन्नाट स्टेप्स, आकर्षक हावभाव आणि सुंदर नृत्यशैली पाहायला मिळते. त्यामुळे डान्सचे हे व्हिडीओ काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात आणि त्यांना नेटकऱ्यांकडूनही चांगली पसंती मिळते.

पावसाळा सुरू झाला की वातावरणात एक वेगळीच उत्साहाची लहर पाहायला मिळते. अनेकांना पावसात भिजत डान्स करण्याचा आनंद लुटायला आवडतो. आवडत्या गाण्यांवर पावसाच्या सरींमध्ये मनसोक्त नाचताना उत्साह आणि आनंद द्विगुणित होतो. त्यामुळे पावसात डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात आणि नेटकऱ्यांची पसंती मिळवतात.

हल्ली सोशल मीडियावर जुन्या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. सध्या एका तरुण-तरुणीचा ‘तुरू तुरू चालू नको’ या गाण्यावर केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही गाण्याच्या तालावर सुंदर डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत. त्यांच्या नृत्याची केमिस्ट्री आणि उत्साही अंदाज नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by @arjunsingh._.12

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @arjunsingh._.12 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अहा… काय नाचलात” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स केला दोघांनीही” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह वाह क्या बात है”