Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका तरूणीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसतेय.

नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी ‘विंचू चावला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय.
यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावर जबरदस्त हावभाव पाहून नेटकरीही शॉक झाले आहेत. सध्या या तरूणीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Priyanka jadhav (@priyankarajeshree33)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @priyankarajeshree33 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप भारी डान्स केलास” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एका युजरने लिहिलेय, “ताई काय सुंदर नाचलीस”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आईशप्पथ किती सुंदर डान्स केलास ताई”