Viral Video: सोशल मीडियामुळे डान्सची कला सादर करण्यासाठी प्रत्येकाला एक व्यासपीठ मिळाले आहे. अनेक तरुण-तरुणी, महिला आणि कलाकार आपल्या आवडत्या गाण्यांवर डान्सचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही व्हिडीओंमध्ये पारंपरिक नृत्याला आधुनिक अंदाजाची जोड दिली जाते, तर काही जण ट्रेंडिंग गाण्यांवर आपल्या खास स्टाइलमध्ये डान्स करताना दिसतात. अशा व्हिडीओंना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स, कमेंट्स आणि शेअर्स मिळतात. त्यामुळे सोशल मीडिया हे मनोरंजनासोबतच आपली नृत्यकला आणि कौशल्य जगासमोर आणण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.
सोशल मीडियावर सध्या डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. विविध गाण्यांवर तरुणाईपासून गृहिणींपर्यंत अनेकजण आपली डान्सची कला दाखवत आहेत. काही व्हिडीओंना नेटकऱ्यांची पसंती मिळते, तर काही व्हिडीओ भन्नाट स्टेप्स आणि अनोख्या अंदाजामुळे चर्चेत येतात.
पावसाळ्यातील डान्स व्हिडीओंनाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळताना दिसते. पावसाच्या सरी, हिरवागार निसर्ग आणि त्यात उत्साहाने डान्स करणाऱ्या तरुण-तरुणींचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. अनेकजण पावसाचा आनंद घेत लोकप्रिय गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. त्यामुळे असे मजेशीर आणि हटके डान्स व्हिडीओ काही वेळातच व्हायरल होताना दिसतात.
पावसात टेरेसवर डान्स करणाऱ्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये पावसाच्या सरींचा आनंद घेत तरुणी लोकप्रिय ‘झुबी-डुबी’ गाण्यावर भन्नाट अंदाजात डान्स करताना दिसत आहे. पावसाळी वातावरणात तिच्या डान्सच्या स्टेप्स आणि उत्साहाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @suraj_rajpurohit14 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर डान्स पोरी” एका युजरने लिहिलेय, “काय नाचलीस गं…” आणखी एका युजरने लिहिलेय, “डान्स असावा तर असा”
