Viral Video: लावणी म्हटलं की ठसकेबाज अदाकारी, ढोलकीचा ताल, पारंपरिक वेशभूषा आणि प्रभावी अभिनय डोळ्यांसमोर येतो. मात्र सोशल मीडियावर लावणीच्या नावाखाली काही अश्लील किंवा अतिरंजित सादरीकरणाचे व्हिडीओही पाहायला मिळतात. त्यामुळे पारंपरिक लावणी आणि अशा सादरीकरणातील फरक समजून घेणे महत्त्वाचे ठरते. खरी लावणी ही महाराष्ट्राच्या लोककलेचा महत्त्वाचा भाग असून तिच्यात नृत्य, अभिनय, संगीत आणि काव्य यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

लावणी हा महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा एक लोकप्रिय नृत्यप्रकार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोलकीचा ताल, ठसकेबाज अदाकारी आणि आकर्षक हावभाव यामुळे लावणी नृत्याला विशेष ओळख मिळाली आहे. पूर्वी लावणी प्रामुख्याने लोककला आणि मनोरंजनाचे माध्यम होती; मात्र आज सोशल मीडियामुळे लावणी नव्या पिढीपर्यंतही मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे. विविध गाणी आणि पारंपरिक लावणीच्या ठेक्यावर तरुणी तसेच महिला नृत्य करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये डान्स, मनोरंजन, कला, भन्नाट स्टंट तसेच हटके क्षणांचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. एखादा व्हिडीओ आवडला किंवा त्यातील प्रसंग वेगळा वाटला की तो यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातो आणि काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतो.

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीच्या लावणी डान्सचा व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘चोरीचा मामला’ या गाजलेल्या गाण्यावर दमदार लावणी सादर करताना दिसत आहे. पारंपरिक लावणीच्या ठेक्यावर तिचे नृत्य आणि हावभाव पाहून नेटकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे. तिच्या नृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Priyanka Gangakhedkar ? (@priyanka_gangakhedkar_official)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील@priyanka_gangakhedkar_official या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “तू तर कमालच केलीस” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स.” आणखी एका युजरने लिहिलेय, “अस्सल लावणी अशीच असते”