Viral Video: आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत लोक स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मानसिक ताण, थकवा आणि अस्वस्थता वाढताना दिसते. अशा परिस्थितीत नृत्य म्हणजेच डान्स हा आनंद आणि आरोग्य देणारा एक प्रभावी मार्ग ठरत आहे. मनसोक्त नाचल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच, पण मनावरचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होतो. पूर्वी नृत्य हे केवळ मनोरंजनासाठी किंवा कार्यक्रमांसाठी केले जायचे. मात्र आता अनेकजण डान्सकडे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराचा व्यायाम होण्यासाठी शिवाय प्रसिद्धी आणि पैसा कमावण्याच्या दृष्टीकोनातूनही पाहत आहेत.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील काही जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहेत. सध्या ‘मेहबूब मेरे’ हे गाणं खूप चर्चेत आहे, ज्याच्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फिजा’ चित्रपटातील ‘मेहबूब मेरे’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका चाळीतील काही तरुणी ‘मेहबूब मेरे’ या जुन्या हिंदी गाण्यावर सुंदर डान्स करत आहेत. त्यांच्या एकापेक्षा एक भारी डान्स स्टेप्स अन् त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्यांचे कौतुक कराल. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gmgjddance या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “व्वा, तुम्ही खूपच सुरेख नाचलात”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “फंटास्टिक, माईंड ब्लोईंग, आउटस्टँडिंग डान्सिंग स्टाईल, ब्रिलियंट डान्सर”; तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच भारी डान्स.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लयभारी गं”
