Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा अनेक गोष्टी सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनविताना दिसतात. या चर्चेत असलेल्या गोष्टींवर अनेक सेलिब्रिटीदेखील रील्स बनवतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुरंधर हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला असून यातील अनेक सीन आणि गाणी सुपरहिट ठरत आहेत. या चित्रपटातील ‘FA9LA’ हे गाणं आणि या गाण्यातील अक्षय्य खन्नाच्या डान्सने अक्षरशः प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. सध्या याच गाण्यावरील एक डान्स खूप व्हायरल होतोय.
हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो. सध्या अशाच काही तरूणींचा डान्स सोशल मीडियावर इतका व्हायरल होतोय जो पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल.
ऑफिस म्हटलं की, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख, तणाव पाहायला मिळतो. परंतु हल्ली अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा यासाठी दररोज काही वेळ किंवा आठवड्यातील एखाद्या वाराला मनोरंजन करण्यासाठी काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्यात खेळ खेळले जातात, गाणी म्हटली जातात किंवा डान्स केला जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काही पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ऑफिसमध्ये ख्रिसमस निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी काही तरूणी धुरंदरमधील ‘FA9LA’गाण्यातील अक्षय खन्नाची चर्चेत असलेली डान्स स्टेप करताना दिसत आहेत. या तरूणींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @nairrrrr.a या अकाउन्टवर शेअर केला असून या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्सहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाईक्स मिळाल्या आहेत. त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्सही येत आहेत. एका युजरने लिहिले, “काय नाचल्या राव ह्या” आणखी एकाने लिहिलेय की, “खतरनाक”, तर आणखीने एकाने लिहिलंय की, “खूपच जबरदस्त”
