Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूणी अतिशय सुरेख असा डान्स करताना दिसत आहे. हा डान्सचा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. तुम्ही आजवर अनेक डान्स व्हिडीओ पाहिले असेल पण या तरुणाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.

हल्ली सतत बॉलीवूडमधील नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या काही तरूणींचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तरुणी खूप सुंदर डान्स करताना दिसत आहेत.

डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. मुलीही अनेकदा एकत्र आल्या की, एखाद्या गाण्यावर डान्स सादर करून दाखवतात. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.

दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर राजकारणातही पाऊल ठेवणारे थलपती विजय सध्या निवडणूक जिंकल्यामुळे आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यामुळे खूप चर्चेत आहेत, त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी दरम्यान, अभिनेत्री तृषाची उपस्थिती पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. तेव्हापासून सोशल मीडियावर २००४ साली प्रदर्शित झालेल्या थलपती विजय आणि तृषाच्या ‘घिल्ली’ चित्रपटातील लोकप्रिय “अप्पडी पोडु पोडु” हे गाणं पुन्हा व्हायरल होतंय ज्यावर अनेक युजर्स रिल्स बनवताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही तरूणी वेगवेगळ्या रंगाच्या सुंदर साडी नेसून “अप्पडी पोडु पोडु” गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. यावेळी त्यांच्या एकापेक्षा एक जबरदस्त डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by The she unit (@the_she_unit)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @the_she_unit या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “अहा, काय भारी नाचल्या” आणखी एकाने लिहिलेय, “कडक डान्स पोरींनो”