Group Dance Video Viral : ‘जुनं ते सोनं’ असं आपण उगाच म्हणत नाही. आजच्या मॉडर्न काळातही ९० च्या दशकातील गाणी ऐकताना मन नकळत त्या काळात हरवून जाते. त्या गाण्यांमध्ये प्रेम, निरागसता, सुंदर शब्दरचना आणि मधुर संगीताचा अप्रतिम संगम होता. म्हणूनच ती गाणी आजही अनेकांच्या भावना आणि आठवणींशी घट्ट जोडलेली आहेत. विशेष म्हणजे, लग्नसमारंभातील हळदीपासून अगदी गणपती आगमन, विसर्जन मिरवणुकीपर्यंत ९० च्या दशकातील ची गाणी आजही प्रत्येक कार्यक्रमात हवी तशी रंगत आणताना दिसून येतात.
सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरुणांचा ग्रुप लोकप्रिय कोळीगीत कावळा पिपेरी वाजवतो वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या प्रत्येक ओळीवर त्यांनी केलेल्या हुबेहूब स्टेप्स, भन्नाट एक्स्प्रेशन्स आणि एकमेकांमधील अफलातून ताळमेळ पाहून तुम्ही अगदी फिदा होऊन जाल. विशेष म्हणजे, या तरुणांची एनर्जी आणि डान्समधील उत्साह इतका भन्नाट आहे की, व्हिडीओ पाहताना नकळत पाय थिरकायला लागतात.
“खूप मस्त आणि परफेक्ट डान्स” (Viral Video)
मोठ्या ग्रुपमध्ये डान्स करण्याची मजाच काही वेगळी असते. एखाद्याची स्टेप थोडी चुकली तरी ती सहज झाकली जाते आणि इतरांचा उत्साह पाहून डान्स न येणाऱ्यालासुद्धा मनापासून नाचावंसं वाटू लागतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद, भन्नाट एनर्जी आणि एकमेकांमधील ताळमेळ संपूर्ण वातावरणच रंगतदार बनवतो. याच उत्साहाची झलक सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ‘कावळा पिपेरी वाजवतो’ या पारंपरिक कोळीगीताला आधुनिक अंदाजात सादर करत या तरुण मंडळींनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mr.razuu_07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “खूप मस्त आणि परफेक्ट डान्स”, “खूप सुंदर एन्जॉय केलं” आणि काही जण इमोजीसह या डान्स ग्रुपचे कौतुक तर इतर मंडळी मित्रांना टॅग करून “आपण पण असा रील बनवूया” असे सांगताना दिसत आहेत; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
