Viral Video: जेव्हापासून लोक सोशल मीडियाचा मोठ्या वापर करू लागले आहेत तेव्हापासून हॉलीवूड, बॉलीवूड, तसेच भारतातील इतर विविध भाषांतील नवीन चित्रपट प्रदर्शित झाले की, त्यातील डायलॉग्ज, गाणी, डान्स स्टेप्सदेखील खूप चर्चेत येतात. मग काय सोशल मीडियावर अनेकांना त्या चित्रपटांतील डायलॉग्जवर रील्स बनविल्याशिवाय, तसेच अनेकांना त्यातील गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. काही महिन्यांपासून एकीकडे ‘धुरंदर’ चित्रपटातील काही गाणी धुमाकूळ घालत आहेत. कधी ‘शरारत’ तर कधी ‘FA9LA’या गाण्यांवरील डान्स खूप व्हायरल होत आहे. पण याच चित्रपटातील गाजलेलं “गहरा हुआ” या रोमाँटिक गाण्यावर एका व्यक्तीने अतिशय सुंदर डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
हल्ली आपली कला सादर करण्यासाठी लोक सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. डान्स, गाणी, अभिनय, पेंटिंग, रेसिपी, कविता अशा विविध कलाकृती लोक आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून जगासमोर आणतात. त्याचील काही लोकांचे व्हिडीओ जगभरातील कानाकोपऱ्यात पोहोचतात ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी, पैसा मिळतो.
सध्याच्या विविध डान्स प्रकारे आवडीने शिकतात ज्यात झुंबा, पाश्चिमात्य, हिपहॉप, सांस्कृतिक किंवा पारंपरिक अशा नृत्यप्रकारांचा समावेश असतो. नृत्य हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण, यातच सगळ्या लोकप्रिय नृत्यप्रकारांपैकी एक प्रसिद्ध म्हणजे कथ्थक आहे. सध्या सोशल मीडियावर सिक्किमच्या प्रसिद्ध कथ्थक कलाकाराचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक जण खूप मोठ्या प्रमाणात प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येत आहेत.
हल्लीच्या काळात कधी कधी काही कलाकार लावणीच्या गाण्यावर हिपहॉप डान्स करताना दिसतात तर कधी पाश्चिमात्य गाण्यावर कथ्थक नृत्य सादर करताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील व्यक्ती चक्क ‘धुरंधर’मधील ‘गहर हुआ’ या रोमाँटिक गाण्यावर कथ्थक स्टाईल डान्स करताना दिसतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, धुरंदरमधील ‘गहर हुआ’गाण्यावर एक व्यक्ती चक्क कथ्थक करताना दिसतेय. यावेळी त्याच्या प्रत्येक स्टेप्स आणि चेहऱ्यावर सुंदर हावभाव तुमचंही लक्ष वेधून घेतील. तिचा हा डान्स सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mingmadlepcha_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “काय नाचली राव हा” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूपच सुंदर डान्स” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “एक नंबर भावा” चौथ्या युजरने लिहिलेय, “खरंच खूप सुंदर डान्स”
