Viral Video: कॉलेजमधील फ्रेशर्स पार्टी म्हणजे नव्या विद्यार्थ्यांसाठी उत्साह, आनंद आणि आपली कला सादर करण्याची खास संधी असते. या कार्यक्रमात तरुण-तरुणी केवळ एकमेकांशी ओळख करून घेत नाहीत, तर आपल्या अंगी असलेले विविध कलागुणही सर्वांसमोर मांडताना दिसतात. कुणी दमदार डान्स करतं, कुणी सुरेल गाणं सादर करतं, तर कुणी अभिनय, कविता, वादन किंवा कॉमेडीच्या माध्यमातून उपस्थितांची वाहवा मिळवतं. स्टेजवर परफॉर्म करताना अनेक विद्यार्थ्यांमध्ये दिसणारा आत्मविश्वास आणि उत्साह पाहण्यासारखा असतो. काही विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच मोठी स्टेज परफॉर्मन्सची संधी असते, त्यामुळे आपल्या मित्रमैत्रिणींसमोर कला सादर करण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा ओळखण्यासोबतच नवीन मित्र जोडण्याची आणि कॉलेजच्या आठवणी आणखी खास बनवण्याची संधी मिळते. सोशल मीडियाच्या या काळात फ्रेशर्स पार्टीतील भन्नाट परफॉर्मन्सचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात शेअर आणि व्हायरल होताना दिसतात.

सोशल मीडिया हे आज कलाकारांसाठी केवळ मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही, तर आपल्या कलेला व्यासपीठ मिळवून देणारं महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. पूर्वी एखाद्या कलाकाराला मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेलिव्हिजन, चित्रपट, स्टेज शो किंवा इतर पारंपरिक माध्यमांची गरज भासत असे; मात्र आता सोशल मीडियामुळे कोणालाही आपल्या घरातूनच कला सादर करता येते. गाणं, नृत्य, अभिनय, वादन, चित्रकला, विनोदी कला किंवा इतर कोणताही कलागुण असो, उत्तम सादरीकरण असेल तर तो काही क्षणांत हजारो-लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. विशेषतः ग्रामीण भागातील आणि लहान शहरांमधील कलाकारांना सोशल मीडियामुळे आपली प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी मिळाली आहे. अनेकदा साध्या मोबाईल कॅमेऱ्यातून शूट केलेले व्हिडीओही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि कलाकारांना नवी ओळख मिळते. त्यामुळे ज्यांना पारंपरिक माध्यमांमध्ये संधी मिळत नाही, अशा कलाकारांसाठी सोशल मीडिया हे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचं प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीत ‘ओ मेरी जान’ या आसामी गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. गाण्याच्या तालावर तिच्या भन्नाट डान्स स्टेप्स, हावभाव आणि आत्मविश्वासाने उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. तिने आपल्या नृत्याची कला सादर करताच विद्यार्थ्यांनीही तिच्या परफॉर्मन्सला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतं. तिच्या नृत्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असून, नेटकरी तिच्या डान्सचं कौतुक करताना दिसत आहेत. कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीतील हा खास परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Bharsu?lina (@bharsu_lina)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @bharsu_lina या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स केलास ”आणखी एकाने लिहिलेय, “मनमोहक सादरीकरण” आणखी एकाने लिहिलेय, “मस्तच.”