Viral Video: सोशल मीडिया हे सध्याच्या घडीचे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मनोरंजन करणारे माध्यम झाले आहे. त्यावर विविध विषयांवरील माहितीपासून ते विविध घटनांचे चांगले-वाईट व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडीओ आपल्या काळजाचा थरकाप उडवतात; तर काही व्हिडीओ आपले मनोरंजन करतात.

खरंतर, भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर तरुणी भारतीय गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नाही तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. समाजमाध्यमांवर भारतीय गाण्यांवर अनेक परदेशातील कलाकार आणि इन्फ्लुएन्सरदेखील ठेका धरताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी पारंपारिक लूकमध्ये सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या ‘दिल्ली से मनाली’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स जबरदस्त असून चेहऱ्यावरली हावभावही सुरेख आहेत. तिचा हा व्हिडीओ सध्या खूपच चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Archana Sharma ? (@archaaana__)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @archaaana__• या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्सहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “खूपच सुंदर डान्स” दुसऱ्याने लिहिलेय, “किती पण बघा मन नाही भरत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “किती भारी गं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचलात”. तर आणखी एकाने व्यक्तीने कमेंट्मध्ये लिहिलंय की, “खरंच खूप भारी”