Viral Video: नृत्य (डान्स ) ही कला आहे. ही कला जोपासावी लागते. प्रत्येक व्यक्ती तिला जमेल तसे डान्स करू शकते पण ज्यांना उत्तम डान्सर व्हायचे आहे असे लोक सातत्याने प्रयत्न करत राहतात आणि आपले सर्वोत्तम परफॉर्मन्स देतात. सध्या अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी तिचे चाहते झाले आहेत.
समाजमाध्यमांवर नवनवीन गाणी, डान्स यांचे व्हिडीओ, तसेच विविध प्रकारच्या गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग्ज किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. दरम्यान, आता ‘जादू की झप्पी’ या गाण्यावर एका तरुणीने जबरदस्त डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. डान्स करणे हा अनेकांसाठी एक उत्तम विरंगुळा असतो. डान्स केल्यावर शरीराचा व्यायाम तर होतोच; पण मनही शांत होते. डान्सची असणारी आवड त्यांना शांत बसू देत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही तुम्हाला असंच काहीतरी पाहायला मिळेल.
हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा हिंदी गाण्यावरील डान्स व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी रस्त्यावर ‘जादू की झप्पी’ या गाण्यावर खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिने लाल रंगाची साडी नेसली आहे, तिच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत कमालीचे आहेत. तिचा हा डान्स पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करत तिचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @crazyy__c या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय,“आईशप्पथ किती भारी” आणखी एकाने लिहिलेय, “किती सुंदर नाचतेस” आणखी एकाने लिहिलेय, “एकच नंबर नाचलीस.”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “लयभारी पोरी”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “याला बोलतात डान्स”
