Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये मनोरंजन, विनोद, स्टंट, प्राणी-पक्षी आणि डान्सच्या व्हिडीओंचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. विशेषतः डान्सचे व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. एखाद्या लोकप्रिय गाण्यावर केलेला डान्स असो किंवा पारंपरिक गाण्यांवर ठेका धरणाऱ्या कलाकारांचा परफॉर्मन्स असो, असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात.
हल्ली सोशल मीडियामुळे अनेकांना आपली नृत्यकला जगासमोर सादर करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये तरुण-तरुणींसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी आणि ग्रामीण भागातील महिलांचाही समावेश आहे. काही जण बॉलीवूड गाण्यांवर डान्स करतात, तर काही जण मराठी गाणी, लोकगीते आणि पारंपरिक नृत्यशैलीतून प्रेक्षकांची मने जिंकतात. विशेष म्हणजे, डान्ससाठी मोठे व्यासपीठ किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज नसते; अनेक जण आपल्या घरात, शेतात, लग्नसमारंभात किंवा सार्वजनिक ठिकाणी डान्स करून व्हिडीओ तयार करतात. त्यांच्या सहजसुंदर नृत्याला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळते. त्यामुळे सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ केवळ मनोरंजनाचे साधन न राहता अनेकांसाठी आपली कला आणि प्रतिभा दाखवण्याचे माध्यम बनले आहेत.
नाना पाटेकर यांचा क्रांतिवीर हा चित्रपट आणि त्यातील ‘मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू’ हे गाणं आजही अनेकांच्या स्मरणात आहे. जुन्या हिंदी चित्रपटांमधील गाणी आजही सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात. प्रेम, भावना आणि जुन्या आठवणींची अनुभूती देणाऱ्या या गाण्यांवर अनेक जण रील्स आणि डान्स व्हिडीओ तयार करतात. त्यामुळे जुन्या गाण्यांची लोकप्रियता नव्या पिढीमध्येही पाहायला मिळते. आता याच गाण्यावरील डान्स एका तरूणीने शेअर केला आहे.
आता सोशल मीडियावर अशाच एका तरुणीचा डान्स व्हिडीओ चर्चेत आला आहे. या तरुणीने नऊवारी साडी नेसून, पारंपरिक दागिने आणि मराठमोळा साजशृंगार करत जुन्या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. नाना पाटेकर यांच्या क्रांतिवीर चित्रपटातील ‘मी पाहिलं तुझ्या डोळ्यांच्या थ्रू’ या गाण्यावर तिने ठेका धरला आहे. तिचा पारंपरिक लूक आणि डान्सची अनोखी शैली नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठमोळ्या वेशभूषेत जुन्या गाण्यावर केलेला हा डान्स अनेकांना आवडत असून, पारंपरिक साडीतील तिचा अंदाज पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अशा व्हिडीओंच्या माध्यमातून जुन्या गाण्यांची मोहिनी आणि मराठी संस्कृतीची सुंदर झलक पाहायला मिळते.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @supriyachavanofficial या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूपच भारी डान्स केलास ताई” एका युजरने लिहिलेय, “एक नंबर डान्स ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह काय सुरेख नाचलीस”
