scorecardresearch

सिंहाला चिडवण्याचा प्रयत्न करताच तो चिडला अन्…; Viral Video वर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया का दिली पाहा

Viral Video: सिंहाला चिडवणाऱ्या तरुणींवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप; नेमकं काय घडलं पाहा

सिंहाला चिडवण्याचा प्रयत्न करताच तो चिडला अन्…; Viral Video वर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया का दिली पाहा
व्हायरल व्हिडीओ (फोटो: सोशल मीडिया)

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ पाहून आपल्या चेहऱ्यावर हसू येते तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला काही वृत्तींचा राग येतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणी सिंहाला चिडवत असल्याचे, त्याची नक्कल करत असल्याचे दिसत आहे. यावर नेटकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्राणी संग्रहालयातील असल्याचा अंदाज व्हिडीओ पाहताना येतो. व्हिडीओमध्ये दोन तरुणी काचेत असलेल्या सिंहाला चिडवत असल्याचे दिसत आहे. सिंह चिडून काचेवर हात मारताना दिसत आहे, तर यावर तरुणीही त्यांची नक्कल करत त्यांना आणखी चिडवण्याचा प्रयत्न करतात. सिंहाला याचा राग आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: चिमुकल्याने चक्क माकडांना केले खेळात सहभागी; हा खेळ पाहून नेटकरीही झाले अवाक, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा- Video: गरीब मुलांना दुकानाबाहेर रोज टीव्ही पाहत असलेले पाहून दुकानदाराने केलेली कृती होतेय Viral

हा व्हिडीओ शेअर करत सुशांत नंदा यांनीही संताप व्यक्त केला आहे. ‘माणूस इतका असंवेदनशील कसा असु शकतो’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. नेटकऱ्यांनीही कमेंट्समध्ये या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. ‘एखाद्याच्या लाचार अवस्थेवर कुणी हसू कसे शकते’, असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 17:43 IST

संबंधित बातम्या