Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एक उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून जीवघेणा स्टंट करीत आहे. त्यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

Alone giraffe's dilemma from a herd of lions
वाईट अंत! एकट्या जिराफाची सिंहाच्या कळपाकडून कोंडी; पुढे असे काही घडले की… Viral Video पाहून उडेल थरकाप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Young Man Swept Away by Flood
एवढी घाई कशाची! पुराच्या पाण्यात वाहून जात होता तरुण, वेळीच लोक धावून आले; व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
A bull Picked up a four-wheeler vehicle with full of people
बापरे! बैलाने चक्क माणसांनी भरलेली चारचाकी गाडी उचलली; Video पाहून येईल अंगावर काटा
Animal fight video deer vs crocodile video
VIDEO: “नशीब नाही मित्रा प्रयत्नांचा खेळ आहे”, हरणानं मृत्यूच्या दारातून मारलेली उडी पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
Biker performs dangerous stunt
‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण एका गडाच्या तटबंदीवरील कट्ट्यावर चढून मागच्या बाजूला उंच उडी मारत आहे आणि पुन्हा स्वतःचा तोल सावरून कट्ट्यावर उभा राहत आहे. तरुणाच्या मागे दिसत असलेली दरी खूप खोल असून, चुकून तरुणाला स्वतःचा जीव सावरता आला नसता, तर त्याला त्याचा जीव गमवावा लागला असता. हा जीवघेणा स्टंट पाहून युजर्स तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iabhi.choudhary या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘गुलाबी साडी’ गाण्यावर मांजरीचा मराठमोळा लूक; Video पाहून नेटकरी म्हणाले, “नखरेवाली माऊ…”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हायरल व्हिडीओतील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “भावा, एक दिवस असाच जाशील; जरा सांभाळून.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे, एकच आयुष्य आहे. असा स्वतःचा जीव धोक्यात घालू नको.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “बहुतेक सध्या यमराज झोपले आहेत.” चौथ्या युजरने लिहिलेय, “खूपच खतरनाक.”