Viral Video: समाजमाध्यमांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वापरामुळे लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. घरातील सदस्यांबरोबर, मित्रांबरोबर समोरासमोर गप्पा मारण्याची मजा हल्ली हरवली असून याची जागा आता मोबाइलवरील रील्सने घेतलेली आहे. सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. अनेकदा आपल्याला भरपूर प्रसिद्धी मिळावी यासाठी कोणत्याही थराला जातात. ज्यात कोणी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो तर कोणी कसलीही पर्वा न करता अश्लील चाळे करताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील. अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो, जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्यूज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण एका उंचवट्यावरून भयानक स्टंट करताना दिसतोय. नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण मुलगा एका किल्ल्याच्या तटबंदीवर उभा राहिला असून तो यावेळी उलटी कोलांटी उडी मारतो आणि किल्ल्याच्या तटबंदीच्या काठावर स्वतःला सावरून उभा राहतो. यावेळी चुकून त्याचा तोल गेला असता तर कदाचित तो खालच्या दरीत पडला असता. हा जीवघेणा स्टंट पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @iabhi.choudhary या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. हेही वाचा: ‘शायनिंग मारणं जीवावर बेतलं…’ रील बनवण्याच्या नादात तरुणाचा डोंगरावरून पाय घसरला; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, ‘लाइक्सच्या नादात..’ पाहा व्हिडीओ: https://www.instagram.com/reel/C6bi8XtvehP/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== युजर्सच्या कमेंट्स चर्चेत एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “प्लीज, एवढी रिस्क घेऊ नका, तुम्हाला काही झालं तर आईचं काय होईल”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “भावा सांभाळून राहा”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “तुला मरायची हौस आहे का?”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप खतरनाक स्टंट”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे सर्व फक्त काही लाइक्ससाठी.”