Viral video: सोशल मीडियावर रील्स संस्कृती विस्तारली आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. खेड्यापाड्यातील तरुणही सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी रील आणि व्हिडीओ बनवण्यात पुढे आहेत. हे तरुण काही लाईक्स आणि शेअर्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. याआधीही व्हिडीओ आणि रील्स बनवण्याच्या हौसेपायी अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात समोर आली आहे, जिथे एक तरुण ट्रेनसमोर रेल्वे रुळांवर विचित्र स्टंट करताना दिसत आहे. रेल्वे रुळावर दुचाकीसह रेल्वेचे इंजिन ओढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

रेल्वे ट्रॅकवर हा धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुण आपली बाईक ट्रेनच्या इंजिनला दोरीने बांधताना दिसत आहे. त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकवर त्याची दुचाकी वापरून ट्रेन खेचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची दुचाकी रेल्वेच्या इंजिनला बांधून धोकादायक स्टंट करतो. सोशल मीडियावर काही लाइक्स आणि सबस्क्राइबरसाठी आपला जीव धोक्यात घालून दुचाकीवर तरुण स्टंट करताना दिसतात. दरम्यान, पोलिसांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेतली आणि रेल्वे ट्रॅकवर हे धोकादायक स्टंट करणाऱ्या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. विपिन कुमार असे या तरुणाचे नाव असून तो देवबंदच्या माझोला गावचा रहिवासी आहे.

shop owner wrote Oh Stree Kal Phir Aana tagline and stree collection name on the shop board
“ओ स्त्री कल फिर आना” दुकानाच्या पाटीवर लिहिली टॅगलाईन, दुकान मालकाची मार्केटिंग स्टाइल पाहून व्हाल अवाक्
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Army officers assaulted and woman gangraped madhya pradesh
Army officers assault Case: ‘बलात्कारी आरोपीला गोळी घाला, नाहीतर मला मारा’, अत्याचारानंतर लष्करी जवानाची मैत्रीण धक्क्यात
indian railway viral video while to help someone else board a train a man missed his own train
ट्रेनमध्ये माणुसकी म्हणून इतरांना मदत करताय, मग ‘हा’ Video पाहाच; लोक म्हणाले, “भावा…”
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Simran Budharup Lalbaugcha Raja Darshan Shocking Experience Video
Video: “धक्काबुक्की केली, फोन हिसकावला, गैरवर्तन केले”; लालबागचा राजाच्या दर्शनाला गेल्यावर अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

उत्तर प्रदेशातील देवबंद-रुरकी रेल्वे मार्गावर ही घटना घडली असून मुझफ्फरनगर जीआरपी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अटकेचे वृत्त नाही. हा धोकादायक स्टंट करताना तरुणाला गंभीर दुखापत झाली असावी असा अंदाज आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! भयावह मगरीला कोंबडीने दिला चकवा, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का

हल्लीचे तरुण-तरुणी कधी कुठे काय करतील हे सांगता येत नाही. फक्त प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठेही रील्स काढणे, डान्स करणे, जीवघेणे स्टंटचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकणे, इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे; अशा अनेक गोष्टी करताना दिसतात. पण, अनेकदा या हलगर्जीपणामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. हा व्हिडीओ @Danishk77853628 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्यावर नेटकरी संतापजनक प्रतिक्रिया देत आहेत.