Viral Video Youtuber arranged Surprise Helicopter Ride For Parents : आई-बाबांसाठी काहीतरी करणे ही जगातील एका सुंदर गोष्टींपैकी एक आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही गोष्टीचा त्याग करा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई बाबांचा त्याग करू नका असे अनेकदा मोठी मंडळी म्हणून जातात. कारण – आपल्या आयुष्यात जे सुख आपण अनुभवतो ते फक्त आई बाबांमुळेच. त्यामुळे त्यांना न मागता त्यांच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे हीच आपल्या यशाची पोचपावती असते. तर आज हीच पोचपावती एका तरुणाला मिळाली आहे. लेकाने आपल्या य-बाबांना पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसवले आहे.
धर्मेंद्र बिलोटिया या भारतीय यूट्यूबरने त्याच्या पालकांना जबरदस्त सरप्राईज दिले आहे. लेकाने आई-वडिलांना आयुष्यात पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा अनुभव सरप्राईज भेट म्हणून दिला आहे. यावेळी आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, उत्सुकता, भावूक क्षण पाहून लाखो लोकांचे मन हेलावले. मध्यमवर्गीय कुटुंबातील पालकांसाठी ही एक स्वप्नपूर्ती होती म्हणूनच हा व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या थेट हृदयापर्यंत जाऊन पोहचला आहे.
“खरं यश तर असंच दिसतं” (Viral Video)
लेकराच्या पाठीवर हात फिरवतात अगदी त्याचप्रमाणे आईने हेलिकॉप्टरवर हात फिरवला. हेलिकॉप्टरमध्ये लेकाच्या शेजारी बसून प्रवासाचा आनंद लुटला. यादरम्यान युट्युबरने पालकांना हेलिकॉप्टरच्या प्रवासाबद्दल त्यांना कसे वाटले, असे हळुवारपणे विचारले. त्याचे आई आणि वडील दोघेही साध्या शब्दांत उत्तर देतात की त्यांना “खूप चांगले वाटले”. संपूर्ण व्हिडीओ शेअर करत “एकेकाळी शेतात उभे राहून हेलिकॉप्टर बघणाऱ्यांना; हेलिकॉप्टरमध्ये बसवलं” ; अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.
व्हिडीओ बघण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @dharmendra_bilotia_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “खरं यश तर असंच दिसतं, जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहत”, “आई-वडिलांसाठी काहीतरी खास करण्याच्या भावनाची तुलना कोणत्याही मौल्यवान गोष्टीशी होऊ शकत नाही”, “एकाच वेळी माझ्या चेहऱ्यावर हसू आणि एकाच वेळी माझ्या डोळ्यात पाणी आलं”, “पालक क्वचितच काहीतरी आपल्याकडे मागतात, त्यामुळे असे क्षण नकळत त्यांच्या आयुष्यात घेऊन जाणे ही खूप मोठी गोष्ट असते”, “यामुळे मला माझ्या पालकांच्या स्वप्नांसाठी अधिक मेहनत करण्याची प्रेरणा मिळाली”, “हे हेलिकॉप्टरबद्दल नाही, तर प्रेमाबद्दल आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत…

