Viral Video: सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील विविध सुंदर क्षण दाखविणारे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. या व्हिडीओंमध्ये बऱ्याचदा शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना कविता शिकविताना दिसतात, तर कधी डान्स शिकवितानाही दिसतात. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जो पाहून नेटकरी शाळेचं कौतुक करताना दिसत आहेत.

शाळा म्हटलं की, आपल्या अनेक जुन्या आठवणी ताज्या होतात. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. हल्ली गावाकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये काही विद्यार्थी चिमणा-चिमणीचे लगीन या गाण्यावर नाचताना दिसले होते. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील विद्यार्थी चक्क शाळेच्या ग्राऊंडबाहेर उभे राहून यात्रेतील डीजेच्या तालावर नाचताना दिसत आहेत.

Mumbai local video of some girls dancing on a marathi song Vatanyacha gol dana in mumbais local train is going viral on social Media
मुंबई लोकलमध्ये “वाटाण्याचा गोल दाणा पोरी…” गाण्यावर तरुणींचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Tourists Pull The Lions Hair And Then Watch What The King Of The Jungle Does Animal Video Goes Viral
पर्यटकांनी चक्क सिंहाच्या केसांना हात लावला; जंगलाचा राजा संतापला अन् दाखवला असा इंगा की…VIDEO पाहून थरकाप उडेल
Farmer success story farmer old lady built bungalow worth 1 crore by selling vegetables video goes viral
“कोल्हापूरच्या आजीचा नाद नाय” भाजी विकून बांधला १ कोटीचा बंगला; VIDEO पाहून अवाक् व्हाल
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच
A girl dances on the song Tauba Tauba
आरारा खतरनाक! ‘तौबा तौबा’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO युजर्स करतायत कौतुक

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ कोल्हापूरमधील एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असून, या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या बाजूला गावची यात्रा सुरू असलेल्या दिसत आहे. यावेळी त्या ठिकाणी डीजेदेखील लावण्यात आला आहे. या डीजेच्या तालावर शाळेतील विद्यार्थी शाळेच्या ग्राऊंडवर नाचताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे शिक्षकदेखील त्यांच्याबरोबर नाचण्यात सहभागी झाले आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ichalkaranji_sound09 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि सात लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करीत आहेत.

हेही वाचा: थरारक! स्वयंपाकघराच्या छतावर लपला भलामोठा नाग; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या एका युजरनं लिहिलंय, “आज जो विद्यार्थी शाळेत गेला नसेल, त्यानं खूप काही मिस केलं.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “लाईकचं बटन आहे तिथे मुलगा नाचतोय तो पाहा.” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “संपला विषय.” आणखी एका युजरनं लिहिलंय, “शाळा हवी तर अशी.”