Viral Video: हल्लीचे शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील धडे शिकवण्यापेक्षा शिक्षण अधिक मनोरंजक आणि कृतीशील करण्यावर भर देताना दिसतात. तंत्रज्ञानाचा वापर, विविध उपक्रम, खेळ आणि नवनवीन पद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवादही अधिक मैत्रीपूर्ण झाला आहे. बदलत्या काळानुसार शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही बदलत असून, विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच इतर कौशल्ये विकसित करण्यासाठीही प्रोत्साहन दिले जात आहे.

हल्ली शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त विविध उपक्रमांमध्येही सहभागी होताना दिसतात. काही शिक्षक विद्यार्थ्यांसोबत मजेशीर रिल्स आणि डान्सचे व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर शेअर करतात. अशा व्हिडीओंमधून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील मैत्रीपूर्ण नाते आणि शाळेतील आनंदी वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे अशा रिल्सना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो.

सध्या सोशल मीडियावर ‘फिरी फिरी नाच पोरा’ हे गाणं चांगलंच चर्चेत आलं आहे. या गाण्यावर तरुण-तरुणींसह अनेकजण भन्नाट डान्सचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गाण्याची तालबद्ध चाल आणि उत्साही संगीतामुळे त्यावर रील्स बनवण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. त्यामुळे हे गाणं नेटकऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे.

याच गाण्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींसोबत उत्साहात नाचताना दिसत आहे. शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांचेही लक्ष वेधून घेत आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by ZILHA PARISHAD SCHOOL PARDI KHURD (@zp_school_stars)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @zp_school_stars या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज अन् हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रत्येक गाण्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना जावं लागतं अभिनंदन सर” एका युजरने लिहिलेय, “वा वा सर क्या बात है, आमच्या सर ची आठवण आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “असं बघून पुन्हा शाळेत जावेसे वाटले . शाळेची आठवण आली. आमच्या वेळेस नव्हते असे सर, मॅडम तरीपण छान आठवणी शाळेच्या शिक्षकांच्या”