Viral Video: शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबर इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अशीच एक चिमुकली वर्गासमोर आपली कला सादर करताना दिसतेय.जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. या भाषांमधील गाणीही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अल्बम साँग असो किंवा चित्रपटातील गाणी असो, ही एकदा चर्चेत आली की सोशल मीडियावरही अनेक जण त्या गाण्यांवर ठेका धरल्याशिवाय राहत नाहीत. मग ते गाणे भारतातील असो किंवा इतर कोणत्याही देशातील; त्या गाण्यावर अनेक लोक रील्स बनवितानाही दिसतात. आतापर्यंत सोशल मीडियावर अशा लाखो लोकप्रिय गाण्यांचे रील्स तयार केल्या गेल्याचे आपण पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात सुप्रसिद्ध एक चिमुकली डान्स करताना दिसतेय.
शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, नेहमीच आपल्या स्मरणात असतात. आताच्या व्हिडीओमध्ये असाच एक गोड क्षण पाहायला मिळत आहे.
हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका गोड चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो खूप चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत येईल, हे सांगता येत नाही. या चर्चेत असलेल्या गाण्यांवर प्रत्येक वयोगटातील लोक, मोठमोठे कलाकारही ठेका धरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘शरारत’, हे गाणं प्रचंड चर्तेत आहे, ज्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकली नाचताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shwetasingh_11.11 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो” आणखी एकाने लिहिलेय, “खूप मोठी हो बाळा” आणखी एकाने लिहिलेय, “एकच नंबर”
