‘जंग जारी है, MSP की बारी है’, आंदोलक शेतकऱ्याची लग्नपत्रिका VIRAL

तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील, पण अशी लग्नपत्रिका तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. ही लग्नपत्रिका एका आंदोलक शेतकऱ्याची आहे.

Wedding-Card-Viral
(Photo: Twitter/ IANSKhabar )

हल्ली लग्न समारंभात लोक काहीतरी हटके करण्याच्या नादात इतके प्रयोग करू लागले आहेत की, त्यांच्या क्रिएटिव्हीटीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात लोकांच्या क्रिएटिव्हीटीचे उत्तम नमुने पाहायला मिळतात. आता ही लग्नपत्रिकाच घ्या. सध्या एक लग्नपत्रिका इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. या अनोख्या लग्नपत्रिकेची कल्पना रचणाऱ्या व्यक्तीच्या क्रिएटिव्हीटीचं खूप कौतुक केले जात आहे. तुम्ही आतापर्यंत अनेक लग्नपत्रिका पाहिल्या असतील, पण अशी लग्नपत्रिका तुम्ही याआधी क्वचितच पाहिली असेल. ही लग्नपत्रिका एका आंदोलक शेतकऱ्याची आहे.

सध्या देशात अशा लग्नपत्रिकांचा ट्रेंड सुरू झाला आहे, ज्यामध्ये काही सामाजिक किंवा राजकीय संदेश लिहिलेले असतात. लग्नात लोकांना आमंत्रित करण्यासोबतच लोक त्यांच्या माध्यमातून पाहुण्यांपर्यंत त्यांची मतेही पोहोचवतात. अलीकडे अशीच एक लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लग्नपत्रिकेत नवरदेवाने MSP संदर्भात आपली मागणी लोकांपर्यंत पोहोचवली आहे.

आणखी वाचा : नवरीने नातेवाईकांसोबत केला जबरदस्त भांगडा डान्स, लग्नाचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हरियाणातील एका जोडप्याने त्यांच्या लग्नपत्रिकेत शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागण्या लिहिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकावर किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी देणारा कायदा करण्याची मागणी या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भिवानी जिल्ह्यातील भूषण गावात राहणाऱ्या व्यक्तीची ही लग्नपत्रिका आहे. या व्यक्तीने आपल्या लग्नपत्रिकेचा वापर एमएसपीच्या मागणीसाठी केला आहे.

आणखी वाचा : दोन ट्रेनमध्ये अडकलेल्या घोड्याचा जीव कसा वाचला? VIRAL VIDEO पाहून तुम्ही थक्क व्हाल!

९ फेब्रुवारी रोजी हे लग्न असून प्रदीप आणि कविता असे नवरा नवरीचं नाव आहे. एकूण १५०० लग्नपत्रिका छापण्यात आल्या असून सर्वांवर ‘जंग अभी जारी है, MSP की बारी है’ असे स्लोगन लिहिलेले आहे. लग्नपत्रिकेत ‘जय जवान, जय किसान’ असा संदेशही लिहिण्यात आला होता. एवढंच नव्हे तर लग्नपत्रिकेच्या एका बाजूला ट्रॅक्टरच्या चिन्हासह ‘नो फार्मर्स, नो फूड’चा नाराही लिहिला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हरीण आपल्यातच धुंदीत, दबा धरून बसलेल्या बिबट्याने चढवला हल्ला

इथे पाहा ही व्हायरल लग्नपत्रिका :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जनतेचं मत समजून घेण्यासाठी पत्रकाराने गाव गाठलं, पण आजोबांचं उत्तर ऐकून चक्रावून गेला

अशी लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची लग्नपत्रिका समाजवादी पक्षाच्या रंगात रंगली होती. त्यात अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव यांचे फोटोही जोडले होते. इतकंच नव्हे तर दुसऱ्या एका कार्डमध्ये नवरा नवरीचे नावही स्केल ऑफ जस्टिसह छापण्यात आलं होतं, जे समानता दर्शवत होतं. याशिवाय मल्याळम सुपरहिरो चित्रपट मिनल मुरलीची थीम आणखी एका साऊथ वेडिंग कार्डमध्ये दिसून आली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral wedding card of haryana couple demanding msp law guarantee prp

Next Story
“आता फक्त बर्फ पडायचा बाकी” कडाक्याच्या थंडीमुळे मुंबईकरांचे झाले हाल; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी