Video: लग्न सुरु असताना मंडपामध्ये माकडाने घेतली एंट्री; नवरदेवाच्या खांद्यावर चढला अन्…

माकडाने लग्नात घेतलेल्या एंट्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

wedding viral video
व्हायरल व्हिडीओ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Viral Video: भारतीय संस्कृतीमध्ये लग्नपरंपरेला खूप महत्त्व आहे. पारंपारिक पद्धतीने लग्न करण्याची बऱ्याचजणांची इच्छा असते. देशातील प्रत्येक भागामध्ये लग्न परंपरेमध्ये फरक आढळला जातो. एका लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येत असतात. लग्नाशी संबंधित सर्व विधी पूर्ण करण्यावर दोन्ही परिवारातील सदस्य भर देत असतात. या पवित्र कार्यक्रमामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सर्वजण तत्पर असतात. लग्नासारख्या महत्त्वपूर्ण समारंभाला अनेक पाहुणे हजर असतात. पण जर समजा तुमच्या लग्नामध्ये एक माकड पाहुणा बनून आला तर… ? सध्या सोशल मीडियावर एका लग्नातला व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये माकडाने विधी सुरु असताना एंट्री घेतल्याचे पाहायला मिळते.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

व्हायरल होणारा हा व्हिडीओ आंध्रप्रदेशमधील एका लग्नातला आहे असे म्हटले जात आहे. दाक्षिणात्य विवाह परंपरेनुसार, एका विधीमध्ये नवरा आणि नवरी दोघांना एकमेकांच्या समोर बसायचे असते आणि मध्यभागी ठेवलेल्या भांड्यामधील धान्य (प्रामुख्याने तांदूळ) एकमेकांच्या डोक्यावरुन खाली सोडायचे असतात. व्हायरल व्हिडीओमध्ये नवरा-नवरी हा विधी करत असतात. तेव्हा अचानक एक माकड तेथे येतं. नवरदेवाच्या खांद्यावरुन डोक्यावर बसायचा प्रयत्न करतं. त्यानंतर नवऱ्याच्या डोक्यावरील तांदूळ उचलून धूम ठोकतो. उडी मारत पळून जाताना तो नववधूच्या डोक्यावर टपली मारुन जातो.

आणखी वाचा – प्राणी संग्रहालयातून पळालेला झेब्रा पोहोचला थेट झेब्रा क्रॉसिंगवर; वाचा मग पुढे काय झालं

लग्नामध्ये आलेल्या या अनपेक्षित पाहुण्यामुळे मंडपामध्ये उपस्थित असलेले बाकीचे लोक हैराण झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. लग्नाला आलेले पाहुणे काहीतरी करणार याआधीच तो माकड तेथून पळून गेला. सोशल मीडियावरील हा व्हिडीओ लाखो लोकांना पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही यूजर्संनी त्या माकडामुळे तेथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या आठवणीत हे लग्न सदैव राहिलं असे म्हटले आहे. तर काहींना नवविवाहित जोडप्याची खुशाली विचारली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 11:09 IST
Next Story
एकाचवेळी २ सायकल पळवणाऱ्या व्यक्तीचा Video व्हायरल, अनोखा जुगाड पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Exit mobile version