दिल्ली आणि सेहवागच्या ट्विटर हँडलवरही ‘Smog चल रहा है!’

सेहवाग म्हणतोय ‘गाळलेल्या जागा भरा’

दिल्लीमध्ये इतना कोहरा है की….. '

धूर आणि धुक्यामुळे देशाची राजधानी दिल्ली सध्या ‘प्रदूषणाची राजधानी’ झाली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून धुरक्यामुळे दिल्लीतली परिस्थिती आणखी वाईट झाली आहे. धुरक्यामुळे समोरच काही दिसेनासं झालं आहे. लोकांचं आयुष्य धोक्यात आलं आहे. शाळा महाविद्यालयात सुटी जाहीर करण्यात आली आहे. अशी चिंताजनक परिस्थिती सध्या दिल्लीत आहे. यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असताना वीरेंद्र सेहवागनंही या चर्चेत उडी घेतली.

नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्विट करत वीरूने या प्रकरणाकडे तमाम भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधले. ‘दिल्लीमध्ये इतना कोहरा है की….. ‘ असं ट्विट करत लोकांना या चिंताजनक स्थितीवर काय वाटतं, याबद्दल लिहिण्याचं आवाहन त्याने केले. सेहवागच्या या ‘गाळलेल्या जागा भरा’ आवाहनाला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर लोक व्यक्त होताना दिसून येत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virender sehwag tweet on delhi smog goes viral

ताज्या बातम्या